〰〰〰〰〰〰〰〰
🇮🇳शाळेचे नाव - जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पाथरी, केंद्र - खंबाळा, पंचायत समिती - किनवट, जिल्हा – नांदेड🇮🇳
〰〰〰〰〰〰〰〰
♻शाळेबद्दल थोडक्यात - पाथरी हे गाव किनवट तालुक्यात असून चिंचखेड वरून उत्तरेला २ किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाचा परिसर डोंगराळ व जंगलाने व्यापलेला आहे. गावाच्या उत्तर दिशेला १ किलोमीटर अंतरावरून पैनगंगा नदी वहाते. गावाच्या पश्चिमेला १ किलोमीटर अंतरावर पुरातन सीतामातेचे मंदिर आहे. गावाच्या जवळील परिसरात रोही, हरणे, माकडे, नीलगायी, अस्वल, ई. प्राणी आढळतात. गावात विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने रहातात. अशा निसर्गरम्य परिसरात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाथरी वसलेली आहे.
♻शाळेची स्थापना - ई. स. १९५४
♻शाळेचे ब्रीदवाक्य - ||विद्या विनयेन शोभते||
♻माजी विद्यार्थी –
💡श्री. सद्गुण इंद्रजीतसिंग तितरे [वैष्णवी कलेक्शन कापड दुकानाचे मालक]
💡श्री. चरण इंद्रजीतसिंग तितरे [संगणक अभियंता]
💡अनिल कबीरसिंग राठोड [प्रा. शिक्षक, नाशिक]
💡श्री. देवराव एस. सोयाम [माजी समाजकल्याण अधिकारी, नांदेड]
💡श्री. रामलू नरसिंगमलू मंदलवार [शिपाई, उपशिक्षण अधिकारी कार्यालय, किनवट]
♻शाळेत राबवले जाणारे उपक्रम -
💡विज्ञान प्रदर्शन
💡स्नेह संमेलन
💡ग्रामस्वच्छता अभियान
💡बंधारा योजना
💡आदर्श परिपाठ
💡रक्षाबंधन कार्यक्रम
💡सुंदर बगीचा
💡थोर महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी
💡क्रीडा स्पर्धा
💡वृक्षारोपण व वृक्षसंगोपन
💡योगासने व व्यायाम
असे अनेक उपक्रम
♻शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमाप्रमाणे, शाळा सुरु होण्यापूर्वी
♻शाळेचा दूरध्वनी/इमेल -
📞७७१९८३००६५
📞७५८८८७५४०४
🌏zppspathari@gmail.com
♻शाळेची फी – निःशुल्क
♻खेळाचे मैदान - आहे. विविध खेळाचे साहित्य देखील आहे.
♻शाळेची यशोगाथा –
💡शै. वर्ष २०१४-१५ मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे सफल आयोजन. केंद्र प्रमुख व शि. वि. अ. यांच्याकडून विशेष अभिनंदन.
💡आंतर शालेय केंद्रस्तरीय स्पर्धात्मक सांस्कृतिक सृजन महोत्सवामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
💡शै. वर्ष २०१५-१६ शै. उठावांतर्गत तंत्रस्नेही शाळेच्या निर्मितीला यशस्वीरीत्या शुभारंभ
💡प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा ८३% निकाल व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा ६०% निकाल
💡इयत्ता पहिली पासून इंग्रजी विषयाचे आनंददायी अध्ययन व अध्यापन
💡विद्यार्थ्यांना शाळेत बागकामाचे धडे
💡शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य, लोकसहकार्य, लोकसहभाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सामाधानकारक
♻शिक्षकवृंद -
👳श्री, निलेश देवरावजी हेडावू, प्रा.प, प्र. मु. अ.
👳श्री. शिवशंकर रघुनाथ डावरे स. शि.
👳श्री. सुनील रामसिंग पवार
👳श्री. यादव मष्णाजी देवकते स. शि.
👳श्री. संदीप भिमराव पाटील स. शि.
➖➖➖➖➖➖➖➖
❄मराठीतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण – सं. युनेस्को
❄देशातील सर्वच बोर्डांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच – वसंत काळपांडे
❄इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असल्यास मराठीवर प्रभुत्व आवश्यक – सं. ब्रिटीश कौन्सिल टेक १३
❄मराठी शाळांची माहिती या अभिनव उपक्रमाद्वारे, शाळा क्र. ५४
❄ब्लॉगर ची लिंक –
zpschoolpathrinanded.blogspot.in
zppspathari.blogspot.com
❄फेसबुक –
https://goo.gl/RH0COf
©मराठी शाळांचे शिलेदार
➖➖➖➖➖➖➖➖
================================================================
🚩लाभले आम्हास भाग्य योजतो मराठी🚩
नॉर्मन्स घराण्यातील सरदार विल्यम यानं 14 ऑक्टोबर 1066 या दिवशी इंग्लंडवर हल्ला करून ते जिंकलं. तेव्हापासून इंग्लंडचा कारभार फ्रेंच भाषेत सुरू झाला. खुद्द पार्लमेंट आणि कोर्ट हे दोन्ही शब्द फ्रेंच आहेत! न्यायप्रक्रियेतील बहुतेक सारेच शब्द फ्रेंचवरूनच घेतलेले किंवा बेतलेले आहेत.
इंग्रजांना शब्द घ्यावे लागले आणि त्यांनी तसे घेताना स्पेलिंग बदललं, उच्चार बदलले. आपल्याला आपल्याच "संडास' शब्दाची लाज वाटते, म्हणून आपण "टॉयलेट' असा प्रतिष्ठित शब्द वापरतो. (स्पेलिंग toilette) या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे, महिलांचं प्रसाधनाचं टेबल किंवा कार्याकरता सजणे. त्याचा "संडास' असा अर्थ करायचं इंग्रजांना कारण काय? त्या वेळच्या इंग्रजांचा हा खोडसाळपणाही असेल.
इंग्रजांना जी गोष्ट नाइलाजास्तव करावीशी वाटली ती योग्य कशी? मग आपण त्यांचे अनुकरण करावे, हा सल्ला तरी उचित कसा ठरेल? रोमन लिपीची वर्णमाला अशास्त्रीय आहे. स्पेलिंग एकच आहे म्हणून उच्चारही सारखेच असतील, असेही नाही. एकाच प्रकारच्या शब्दांची अनेकवचनेही वेगवेगळी. सर्वच भाषांत अनियमितपणा असतो, हे मान्य केले तरी इंग्रजीतील उच्चारांत, स्पेल्लिंगांत, व्याकरणात, शब्दार्थांमध्ये जी अनागोंदी शिरली, तिला भाषेचा टणकपणा कसे म्हणायचे? आता king, queen, priest, palace, treasury आदी शब्द पाहा. या कल्पना परस्परांशी संबंधित असूनही शब्द म्हणून त्यांच्यात काहीच संबंध नसावा? याउलट मराठीतील हे शब्द पाहा. राजा (राजन्) या शब्दाचे ज्ञान झाले, की राणी(राज्ञी), राजपुत्र, राजकन्या, राजकोश, राजदूत इत्यादी शब्द उपलब्ध होतात.
"इसॉफेगस' म्हटलं तर सामान्य व्यक्तीला काही कळत नाही. पण अन्ननलिका (नळी?) शब्दानं लागलीच कळतं. त्याचं मुख्य कारण आपल्याला अन्न माहीत आहे आणि नलिकाही माहीत आहे. हे करण्यात जी दिरंगाई केली त्यामुळं इतरत्र शब्द निर्माण होण्याच्या अफाट वेगाशी स्पर्धा करू शकणारच नाही, असं वाटण्याजोगी परिस्थिती आली आणि ती आपणच ओढवून घेतली आहे.
आपल्या भाषा दरिद्री मुळीच नाहीत. इंग्रजीच्या तुलनेत वैज्ञानिक वाङ्मय मराठीत कमी आहे हे खरे; परंतु आरंभी इंग्रजीने इतर भाषांतून भाषांतर करून ते ज्ञान त्यांच्या भाषेत आणलेच ना? मग आपले हात कोणी बांधले आहेत? अद्यापही वेळ गेलेली नाही.
पूर्ण लेख वाचण्याकरिता खालील लिंक पहा.
http://goo.gl/BAehrI
〰〰〰〰〰〰〰
✒प्रा. मनोहर राईलकर
[मराठी भाषा अभ्यासक]

सीबीएसई, आयसीएसई किंवा राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकताना पालक म्हणून आपण पुढील बाबींचा विचार करतो काय?
♻केवळ प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून तर आपण मुलांच्या शाळेची निवड करत नाही नं?
♻शाळेची फी आणि इतर खर्च आपल्याला परवडण्यासारखे आहेत काय? या खर्चांमुळे अनावश्यक ताण येऊन घरातले वातावरण कायम चिंताग्रस्त तर राहत नाही नं? (तसे असेल तर आपल्या मुलांच्यासुद्धा मानसिक स्थितीवर, आणि पर्यायाने त्याच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होईल.)
♻मुलांसाठी पुस्तके, खेळणी, त्याच्या आवडीच्या इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा शिल्लक राहतो काय?
♻शाळेकडून आपले आर्थिक शोषण होते अशी भावना आपल्या मनात असते काय?
♻शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून आपल्याला शाळेत मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आपण समाधानी असतो काय? शाळेत वावरताना आपल्याला मोकळेपणा वाटतो काय? कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड तर वाटत नाही नं?
♻केवळ उच्चभू समाजातच वावरल्यामुळे सभोवतालच्या समाजाबद्दल तुच्छतेची भावना तर निर्माण होत नाही नं?
♻आपली मुले शाळेत काय शिकली आहेत; त्यांना अभ्यासात काही अडचणी असतींल तर त्यांना आपण मदत करू शकतो काय?
♻आपल्या मुलांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी आत्मविश्वासाने संवाद साधू शकतो काय?
♻या शाळांमध्ये इंग्रजी आणि इतर विषयांत आपल्या मुलांची जी प्रगती होत आहे ती आपल्याला समाधानकारक वाटते काय?
♻आपला मुलगा (मुलगी) इंग्रजीतील ललित आणि ललितेतर साहित्य आवडीने वाचतो काय?
♻आपला मुलगा (मुलगी) इंग्रजीतून स्वयंस्फूर्तीने लिहितो काय?
♻आपली विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होतात काय?
♻आपला मुलगा (मुलगी) गणित ऑलिम्पियाड, होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि शाळेबाहेरील इतर विविध संस्थांनी आयोजित केलेल्या इतर स्पर्धांमध्ये सहभागी होतो काय? असल्यास त्याच्या संपादणुकीबाबत आपण सहभागी आहात काय?
♻मुलाची शोधक वृत्ती आणि सर्जनशीलता यांना शाळेत वाव मिळतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपली मुले शाळेत गेल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न केल्यास उशीर झाला असण्याची शक्यता आहे. इतर मुलांचे अनुभव काय आहेत ते डोळसपणे पहा. त्यांच्या पालकांच्या जागी स्वत:ला ठेवा. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी किंवा केजीमध्ये घातले असेल तर पुढे काय परिस्थिती असेल याचा विचार करा. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतरच योग्य त्या शाळेची निवड करा..
➖➖➖➖➖➖➖➖
✒वसंत काळपांडे
माजी संचालक, बालभारती
आणि माजी अध्यक्ष,
राज्य मंडळ (एस. एस. सी. बोर्ड)
🌏ईमेल -vasant.Kalpande@gmail.com
©मराठी शाळांचे शिलेदार
➖➖➖➖➖➖➖➖
➡संदेश पुढे पाठवा➡